ग्लोबल विकास ट्रस्टच्या ग्लोबल परळी या प्रकल्पात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आम्हाला फळ लागवडीला मिळालेल्या अभूतपूर्व यशा नंतर जास्तीत जास्त शेतकयांना फळलागवडीकडे वळवण्यासाठी आम्ही शेवगा लागवड संदर्भातील माहिती व्हिडीओ स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत. हि माहिती आपणास ट्रेनिंग स्वरूपात देताना आम्हाला फार आनंद होत आहे. आपण याचा आपल्या शेती साठी नक्की उपयोग कराल.
शेवगा पिकाच शास्त्रिय नाव मोरिंगा अलिफेरा हे आहे. मॉरिंगेशिये कुळातल्या मोरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधी प्रदेशात आढळणारी वनस्पती आहे .याची पाने ,फुले तसेच शेंगाचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.