सिद्धिविनायक मोरिंगा हि जास्त उत्पादन देणारी फळाची जात आहे. त्या प्रजातीची तसेच गुणवत्तेची माहिती येथे उपलब्ध करून देत आहोत.
दुधाच्या ४ पट ,मटणाच्या ८०० पट कॅल्शियम असूनही हि तुरट वनस्पती चवदार आहे. ३०० हुन अधिक विकारावर मात करणारी, कुपोषण थांबवणारी अशी हि एकमेव वनस्पती आहे. सिद्धिविनायक मोरिंगा या जातीची शेंग हि दिसायला हिरवी गर्द व आकर्षक दिसते तसेच शेंगाची साईज हि एक सारखी असून त्यांची लांबी साधारण दीड फुटापर्यंत असते. या शेंगांमध्ये गराचे प्रमाण अधिक असल्यामुळे बाजारपेठेत या जातीच्या शेंगेला जास्त महत्व आहे.
शेवगा हे एक कमी पाण्यात येणारे पिक आहे. शेवग्याची लागवड प्रामुख्याने दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते. बाजारात आज उपलब्ध असलेल्या विविध जातीपासून साधारणतः 200 ते 300 शेंगा एका झाडापासुन मिळतात.
दक्षिण भारतातून जुलै ते सप्टेंबर व मार्च – एप्रिल महिन्यात शेवग्याची आवक जास्त असते. भारता व्यतिरिक्त पाकिस्तान, श्रीलंका, जमैका, सिंगापूर, क्युबा, आणि ईजिप्त या देशात शेवग्याची लागवड केली जाते. तामिळनाडू राज्यात उन्हाळाच्या दिवसात शेवग्याची आवक मोठ्या प्रमाणावर असते.