प्रत्येक पिकात आंतरपिक घेवून सर्वाधिक उत्पन्न घेण्या मध्ये कसा फायदा आहे हे इथे सांगण्यात आल आहे
मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन मध्ये शेवगा या पिकाची आंतरपिक म्हणून लागवड केली जाते. पहिल्या वर्षी कोणतेही आंतरपिक चालू शकते. परंतु जस जशी शेवगा या पिकाची वाढ होते आणि व्यास वाढत जातो तेव्हा आंतरपीक घेण कठीण होत त्यामुळे आपण आंतरपिकाची शिफारस टाळतो.
रबी हंगामात शेतकऱ्याना आपण भाजीवर्गीय पीक घेण्यास सांगतो कारण एक दोन महिन्यात त्याचे उत्पन्न निघते. आणि जे शेतकरी उन्हाळ्यात लागवड करतात त्यांना भाजीवर्गीय पिकामध्ये चांगल उत्पन्न मिळू शकते. कारण शेवगाच्या झाडाची सावली पातळ असल्यामुळे आंतरपिकाची वाढ चांगली होते आणि चांगले उत्पन्न शेतकरी काढू शकतात. पालक, शेपू आणि पुदीना हे आंतरपिकाचे पर्याय होऊ शकतात.