शेवगा भाग 1 लागवड पूर्व | Drumstick Section 1 Pre-Plantation

शेवगा पिकाची लागवड सर्वप्रथम मेक्सिको येथे करण्यात आली आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प बंगाल , आसाम, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात पपई या पिकाच्या वेगवेगळ्या जातीची लागवड करण्यात येते.मात्र तैवान पपईच्या जातीची साल जाड असल्यामुळे फळ टिकण्याचा  कालावधी जास्त व चवीला गोड , उत्पादन क्षमता अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायक मोरिंगा या जातीची लागवड केली जाते .

शेवगा भाग 2 लागवड करताना | Drumstick Section 2 During-Plantation

लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन यथे करण्यात आला आहे.

शेवगा भाग 4 यशोगाथा | Drumstick Section 4 Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 3.4 | Pruning Techniques | छाटणी तंत्र

रोप लागवड केल्यानंतर रोपाच्या २ ते २.५० फूट उंची वरती रोपाचा शेंडा कट करावा. तेथून पुढे प्रत्येक उपफांद्याची व शेंड्याची छाटणी २ ते २.५० फूट उंचीवर करावी. दरवर्षी मे महिन्यात झाडाची २ फूट उंची ठेऊन खरड छाटणी करावी .   

अश्या प्रकारे छाटणी केल्या मुळे झाडांची वाढ व्यवस्थित होते. आणि फळ आणि फुलांची संख्या वाढून उत्पादन वाढण्यास मदत होते. आपण कितीही व्यस्त असाल तरीही छाटणी योग्य प्रकारे आणि योग्य वेळेत होणे आवश्यक आहे. जर आपण अस नाही केले तर झाडाची उंची वाढून फळं आणि फांद्याची  संख्या कमी रहाते आणि अपेक्षित उत्पन्न निघत नाही आणि हार्वेस्टिंगला पण त्रास होतो.

अशा प्रकारे छाटणी केल्यामुळे आपणास पहिल्या वर्षी एका वर्षाच्या झाडा पासून १८ते २० किलो उत्पन्न दोन बहारात मिळू शकते.  

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping