लिंबू भाग 1 लागवड पूर्व प्रशिक्षण | Lemon Section 1 Pre-Plantation

लिंबू भाग 2 लागवड करताना प्रशिक्षण | Lemon Section 2 During-Plantation

लिंबू भाग 3 लागवडीनंतर प्रशिक्षण | Lemon Section 3 Post-Plantation

Introduction | प्रस्तावना

लिंबू  अत्यंत महत्वाची प्रजाती लिंबूवर्गीय फळामध्ये असून त्याला रोजच्या दैनंदिन जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्रात लिंबूची झपाट्याने वाढ होत असून ४०००० हेक्टर क्षेत्रात लिंबूची लागवड केली जात आहे. लिंबू जागतिक पातळीवरील फळ असून मुख्यत्वे आशिया आणि अमेरिका खंडात लिंबू पिकाची लागवड केली जाते.

लिंबू फळपिकाच्या पोषणविषयक आणि एकूण आहारातील मूल्यामुळे या पिकाचं जास्त महत्व आहे. लिंबापासून रस, सरबत, लोणचे, पन्हे इत्यादी पदार्थ तयार करता येतात. लिंबापासून काढलेल्या तेलाचा उपयोग खाद्य पदार्थाना सुगंध आणि स्वाद आणण्याकरीता, तसेंच साबण निर्मितीसाठी आणि कपड्याना रंग देण्यासाठी  केला  जातो. लिबांच्या रसात ६. ३ ते  ६. ६  टक्के  सायट्रिक ऍसिड असत.  लिंबू हे गरिबापासून श्रीमंतांपर्यन्त शाकाहारी तसेंच मांसाहारी आहारात तसेंच धार्मिक कार्यासाठी असलेल सर्वसामान्य फळ आहे. 

 

लिबांच्या सुधारित जाती पैकी साई-शरबती जात पुढील वैशिष्ट्यांमुळे प्रचलित आहे. 

  1. उत्पादन: ४६.९० टन /हेक्टर/ वर्षे
  2. फळाचे वजन: ४९. ८७ ग्रॅम 
  3. रसाचे प्रमाण :५४.५१ %
  4. सालीची जाडी :१.५२ मि. मी.  
  5. उन्हाळी उत्पादन: २४. ४७% 
  6. बी /फळ-६ 
  7. एक सारखी आकाराची फळे
Wishlist 0
Open wishlist page Continue shopping