पपई भाग 1 लागवड पूर्व प्रशिक्षण | Papaya Section 1 Pre-Plantation

लागवड करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती इथे दिली आहे.

पपई भाग 2 – पपई लागवड करताना | Papaya Section 2 During-Plantation

पपई लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन या भागात करण्यात आले आहे.

पपई भाग 3 – पपई लागवडीनंतर | Papaya Section 3 After-Plantation

पपई लागवड केल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती या सत्रात देन्यात आली आहे.

पपई भाग 4 – यशोगाथा | Papaya Section 4 – Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 1.1 | Introduction | प्रस्तावना

ग्लोबल विकास ट्रस्टच्या ग्लोबल परळी या प्रकल्पात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आह्माला फळ लागवडीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर जास्तीत जास्त शेतकयांना फळलागवडीकडे वळवण्यासाठी आह्मी पपई लागवड संदर्भातील माहिती व्हिडिओ स्वरूपात आपणास उपलबध करून देत आहोत. हि माहिती आपणास ट्रेनींग स्वरूपात देताना आह्माला फार आनंद होत आहे. आपण याचा आपल्या शेती साठी नक्की उपयोग कराल.
पपई पिकाची लागवड सर्वप्रथम मेक्सिको येथे करण्यात आली आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प बंगाल , आसाम, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात पपई या पिकाच्या वेगवेगळ्या जातीची लागवड करण्यात येते.मात्र तैवान पपईच्या जातीची साल जाड असल्यामुळे फळ टिकण्याचा कालावधी जास्त व चवीला गोड , उत्पादन क्षमता अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तैवान ७८६ या जातीची लागवड केली जाते . पपई खाण्यासाठी जशी चविस्ट आहे तसे ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पपईचे आहारात सेवन केल्यामुळे भूक वाढते व पोटाचे, यकृताचे , आतड्याचे तसेच अशाप्रकारच्या व्याधी पासून मानवी शरीराला दूर ठेवते . पपई मध्ये A , B, आणि D हे जीवनसत्व व कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते. पपई पिकाचे शास्त्रीय नाव कॅरिक पपया आहे. भारत देशात प्रति वर्षी २६ लाख टन उत्पादन होते.

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping