पपई भाग 1 लागवड पूर्व प्रशिक्षण | Papaya Section 1 Pre-Plantation

लागवड करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती इथे दिली आहे.

पपई भाग 2 – पपई लागवड करताना | Papaya Section 2 During-Plantation

पपई लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन या भागात करण्यात आले आहे.

पपई भाग 3 – पपई लागवडीनंतर | Papaya Section 3 After-Plantation

पपई लागवड केल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती या सत्रात देन्यात आली आहे.

पपई भाग 4 – यशोगाथा | Papaya Section 4 – Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 1.2 | Land Selection | जमीन निवड

पपईच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम भारी जमीन योग्य आहे. तसेच गाळाची मध्यम काळी जमीन पपई लागवडीस पूरक असते कारण पपईची मुळे जमिनीत ४५ से.मी पर्यंत खोल जातात. जमिनीतून अतिरिक्त पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होणे फार महत्वाचे आहे. मध्यम हलकी ६.५ ते ७.२ सामू (पी. एच) लागवडीसाठी निवडावी. चिकट माती किंवा खडकाळ जमिनीत पपई लागवड करू नये, कारण अश्या जागेत झाडांची मुळे पाण्याशी संसर्ग येऊन कुजतात व हळू हळू सर्व झाडे मरतात.त्यामुळे पपईच्या लागवडीसाठी हलकी मध्यम व उत्तम पाण्याचा निचरा होणारी रेती मिश्रित पोयटा जमीन योग्य असते .तसेच पाणथळ ,चुनखडीयुक्त जमीन पपई लागवड करण्यासाठी अयोग्य असते

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping