ज्या जमिनीची निवड केली आहे त्याच मातीपरीक्षण करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे आपणास माती मध्ये अपुऱ्या असणाऱ्या मूलद्रवे अन्नद्रवे यांची माहिती मिळते. आणि आणि त्यानुसार आपण जमिनीला रासायनिक , सेंद्रिय आणि आणि हिरवळीच्या खतांचा खुराक देऊ शकतो . जो उत्पन्न वाढीसाठी साठी उपयुक्त ठरतो. पाणी परीक्षण हे देखील म्हत्वाचा मूद्दा आहे. कारण सर्व शेतकरयांकडे सिंचन व्यवस्था हि वेगवेगळी असते.कोणाकडे विहिरीचे,तलावाचे,धरणाचे किंवा बोरवेलचे पाणी असते त्यामध्ये क्षारांच प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे त्याचा अभ्यास करून तज्ञानी सुचवलेली उपाययोजना आपणास करावी लागते. कारण ती पिकाच्या वाढीस पूरक असते.