1) नांगरणी:
पपई लागवड करण्यापूर्वी शेतातील पूर्वीच्या पिकाचे अवशेष उचलून घेऊन प्रति एकरी ५ ट्राली शेणखत टाकून जमिनीची ६० ते ७० सेमी खोली पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. व जमीन १० ते १५ दिवस उन्हात तळू द्यावी.
2) रोटाव्हेटर:
जमीन खोल नांगरणी झाल्यानंतर रोटाव्हेटर मारून घ्यावे .तसेच उभ्या आडव्या पाळ्या घालून घ्याव्यात.
3)बेड तयार करणे:
जमीन योग्य तळल्यानंतर जमिनीमध्ये शेणखत मिसळून घ्यावा नंतर लागवडीयोग्य अंतर निवडून त्या अंतराच्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने दीड फूट रुंदीचे व सव्वा फूट उंचीचे बेड तयार करून घ्यावेत.व त्यावरती भेसल डोस भरून घ्यावा.कारण बेड करून पपई लागवड केल्यामुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा योग्य होऊन झाडाची वाढ चांगली होते.
4) ठिबक:
बेड च्या लांबीनुसार योग्य ठिबक लाइन बेडच्या मध्यभागी अंथरून घ्यावी. उन्हाळ्यामध्ये लॅटरल तापत असते त्याचा चटका लागून रोप मरतात त्यामुळे रोपापासून लॅटरल किमान १० सेमी दूर ठेवावा ( साधारण २०० मी लांबीपर्यंत १६-४-४० व २०० मी पेक्षा जास्त अंतर असल्यास २०-४-४० ठिबक लाईन चा वापर करावा.
5) मल्चिंग:
ठिबक लाईन अंथरल्यानंतर बेड वरती २० ते २५ मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरावा . विशेष म्हणजे मल्चिंग द्वारे हवा आत जाणार नाही यासाठी मल्चिंग पेपर वरती दोन्ही बाजूनी मातीचा थर द्यावा . योग्य अंतरावरती २.५ सेमी व्यासाचे छिद्र पाडून घ्यावे.