पपई भाग 2 – पपई लागवड करताना | Papaya Section 2 During-Plantation

पपई लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन या भागात करण्यात आले आहे.

पपई भाग 4 – यशोगाथा | Papaya Section 4 – Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 3.3 | Pests | पपईवरील कीड व रोग आणि त्याच नियंत्रण.

कीड :-
१) मावा –
लक्षणे – मावा ही कीड पाने ,फुले व कोवळ्या शेंड्यातील रस शोषून घेते त्यामुळे पपई झाडाची पाने आकडल्यागत झालेली आढळतात.
उपाय – गंधकाची कोरडी बुकटी पानाच्या खालच्या खालच्या बाजूवर धुरळावी तसेच प्रोटेक्टंट २ ग्रॅम आणि हार्मोनी २ मिली प्रति एक लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

२) तुडतुडे – पाने ,फुले व कोवळ्या शेंड्यातील रस शोषणाऱ्या व खरवडणाऱ्या किडीमुळे कोवळ्या पानावर हिरवे,पिवळे चट्टे पडतात.पाने ओढल्यासारखी दिसतात किंवा गोळा होतात.कोवळी फुले रस शोषल्यामुळे गाळून पडतात.कि कीड कापूस,वांगी,भोपळा,काकडी इत्यादी पिकांवर आढळते.या किडीमुळे विषाणू रोगाचा पपईच्या झाडावर प्रसार होतो.
उपाय – गंधकाची कोरडी बुकटी पानाच्या खालच्या खालच्या बाजूवर धुरळावी तसेच प्रोटेक्टंट २ ग्रॅम आणि हार्मोनी २ मिली प्रति एक लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी .

३) लाल कोळी – हि कीड पानाच्या खालील बाजूस जमावाने आढळते,पानातील रस शोसून घेते पाने पिवळी पडतात व झाडावरील पिकणाऱ्या पृष्ठ भागावर जर हि कीड आढळून अली तर फळाची साल खरबडीत व अनैसर्गिक तपकिरी रंगाची दिसतात.
उपाय – गंधकाची कोरडी बुकटी पानाच्या खालच्या खालच्या बाजूवर धुरळावी तसेच प्रोटेक्टंट २ ग्रॅम आणि हार्मोनी २ मिली प्रति एक लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी .

४) सूत्रक्रमी –
पपई झाडाच्या मुळावर गाठे करणाऱ्या सूत्रकृमी आणि रेनिफॉर्म सुरुवातीला ठिपक्यांचा आकार १ मिमी असतो.नंतर तो ४ ते ८ मिमी होतो.या किडीमुळे फळाची वाढ होत नाही फळ वेढे वाकडी होतात.तेलकट ठिपके पानाच्या देठावर व खोडाच्या कोवळ्या भागावर दिसतात या विषाणू रोगाची बाधा काकडी वर्गातील पिकांना होते त्यापासून रोगांचा प्रसार पपईच्या झाडावर होतो.पपईच्या झाडाच्या मुळांवर सूत्रकृमी गाठी करतात त्यामुळे झाडांची वाढ कमी होते व उत्पादन कमी होते.
उपाय –
सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी ३ क्विंटल इथिलिन डायग्रोमाईड जमिनीत मिसळून देण प्रत्येक झाडाच्या जमिनीत २० ग्राम फ्युराईडनं मिसळून द्यावे. निंबोळी ,करंज ,एरंडी ,पेंड जमिनीत मिसळावी बागेत झंडूची झाडे लावावे.

५) मिलीबग –
लक्षणे – १) पाने पिवळी पडणे,पाने वेडी वाकडी होणे,पानाची वाढ थांबून फळगळ होते विशेषतः फळावर पंधरा चिकट द्रव तयार होतो,झाडावर लाल किंवा काळ्या वाढतात पानांच्या खालच्या भागावर मधासारखा किंवा पंधरा चिटक पदार्थ दिसतो,त्यावर काळी बुरशी वाढ होऊन पाने काळी पडतात.
उपाय – १) प्रथम बाग तणमुक्त करावी,प्रादुर्भाव ग्रस्त भाग काढून टाकावा.मिलीबग या सारखी लक्षणे दिसणाऱ्या झाडाला कोमट पाण्यात थोडा निरमा किंवा पेट्रोल किंवा साबण टाकून व्यवस्थित धुऊन काढावीत तसे या किडीच्या प्रसाराचे नियंत्रण करण्यासाठी जवळ पासच्या झाडावर निम तेलाची किंवा पायरेथ्रीनचि फवारणी करावी.

६) पांढरी माशी –
लक्षणे – हि कीड पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने खालच्या बाजूला आकुंचन पावतात,पाने पिवळी पडतात त्यामुळे ती आकाशल्यासारखी दिसतात व खाली जमिनीच्या बाजूस दुमडलेली आढळतात
उपाय –
एसीटामप्रिड 20%: 0.5 ग्रॅम ग्राम/ लीटर, निमोईल 1500 पीपीएम: 2 मिली / लीटर, स्प्लेंडर 2 मिली / लीटर स्प्रे करणे.

* रोग :-
१) चुरडा मुरडा (लिपकर्ल) :-
लक्षणे – या विषाणू मुळे पपई झाडाची पाने वेडीवाकडी होतात पानाचा आकार लहान राहतो या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. पानावर हिरवे पिवळे चट्टे आलटून पलटून दिसतात. झाडाची वाढ खुंटते, फळे लहान राहतात व बेचव लागतात

उपाय –
पांढरी माशी किडीचे नियंत्रण करावे म्हणजे रोगाचा प्रसाराला पायबंद बसतो.
थ्राईवर क्रॉम्पशाईनर प्रत्येकी ५०० मिली आणि हार्मोनी २००मिलीची १०० लिटर.
पाण्यात मिसळून फवारणी करावी.

2) पापाया मोझॅक: –
लक्षणे – हा विषाणूमुळे येणारा रोग असून या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पपईच्या झाडावर येणारी पालवी पिवळसर दिसते.वाढीच्या काळात पानाच्या शिरा हिरव्या दिसुन हाताला चरचरीत लागतात.अशा रोग्रस्त झाडाची फळे आकाराने लहान व वेडीवाकडी होतात त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होते.

उपाय:-
असे झाड आढळल्यास त्या झाडावर कीटक नाशकाची फवारणी कारवी. त्यानंतर हे झाड उपटून नष्ट करावे.
प्रोटेक्टट ५०० ग्राम ते १ किलो + १५०लिटर पाणी फवारावे

3) करपा:-
लक्षणे:- या रोगात प्रथम फळवर व झाडाच्या खोडावर फिकट पिवळ्या रंगाचा चट्टा दिसून येतो.तो भाग नंतर मऊ पडून त्याचा रंग तपकिरी होतो.त्यानंतर मध्यभागी काळ होऊन भोवती पिवळा रंग दिसतो.हा रोग प्रामुख्याने हिरव्या व न पिकलेल्या फळावर आढळून येतो.हा बुरशीजन्य रोग आहे हि बुरशी लहान लहान छिद्र पडते व पाने गळतात.हिरव्या फळावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात

उपाय :-
रोगाची बांधा झालेली फळे व देठ काढून टाकावेत
उन्हापासून सरंक्षयासाठी फळाभोवती पालीथीन लागत गुंडाळावेत
खोडावर करपा रोग आढळल्यास त्या भागावर व त्याच्या बाजूला थ्राईवर क्रॉपशाईनर
प्रत्येक ५०० ml व हार्मोनी २०० ml 100 लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणाची
फवारणी करावी फळे कागदाने झाकावीत .

३) पायकूज (बुंधासड )
लक्षणे :-
ज्या जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाही अशा जमिनीत झाडांवर या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो .
मुलीच्या सालीवर स्वजी व पाणी शोषलेले चट्टे दिसतात त्याच वेळी झाडाच्या शेंड्यावरील पाने खाली वाकतात, सुकतात,पिवळी पडतात आणि अकाली गाळून पडतात.

उपाय :-
मुसळधार पाऊस सुरु होण्यापूर्वी पाण्याचा निचरा होणयासाठी चार खोदून तयार करावे .
खोल आंतरमशागत करू नये .
रोगाची लक्षणे दिसताच रोगाची बाधा झालेल्या खोडावरील भाग खरडून काढावा आणि तेथे बोर्डोपेस्ट लावावी .
प्रतिबंधक उपाय म्हणून एक टक्का बोर्डो मिश्रण किंवा एक लिटर पाण्यात २ ग्राम कॉपर ऑक्सिफ्लोराइड मिसळून त्या द्रावणाची झाडाच्या बुंध्याजवळ फवारणी करावी.

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping