पपई भाग 2 – पपई लागवड करताना | Papaya Section 2 During-Plantation

पपई लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन या भागात करण्यात आले आहे.

पपई भाग 4 – यशोगाथा | Papaya Section 4 – Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 3.5 | Organic Fertilizer | सेंद्रिय खत

पपई पिकाला शक्यतो सेंद्रिय खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे पपई उच्च दर्जाची मधुर स्वादाची तयार होते. आवश्यकतेनुसार रासायनिक खते मिश्रखताच्या स्वरूपात द्यावीत. खत देताना झाडाच्या मुळ्या तुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी

सेंद्रिय खताचे फायदे पुढीलप्रमाणे

 • खर्च कमी 
 • जमिनीचा पोत सुधारेल 
 • उत्पन्न वाढण्यास मदत होईल 
 • मालाची प्रत सुधारते.

जीवामृत 

साहित्य

 • १० किलो गाईचे शेण 
 • लिटर गाईंचंय गोमूत्र 
 • किलो बेसन पीठ 
 • किलो गूळ 
 • २०० लिटर पाणी

 

२०० लिटर प्लास्टिक च्या ड्रम मध्ये  मिश्रण एकत्रिक करून सहा दिवस झाकून ठेव्हावे. सहा दिवस नंतर तयार झ्हालेले जीवमुर्त २०० लिटर प्रति एकर प्रमाणानें पिकाला द्यावे.

 

वेस्ट डी कंपोझर

वेस्ट डी कंपोझर पिकाच्या वाढीसाठी तसेच विविध अपायकारक बुरशी विषाणूंपासून सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. जमीनिच्या सुपिकतेसाठी, पिकाच्या वाढीसाठी रक्षणासाठी याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो.

ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधे अभावी जनावरे पाळणे शक्य नाही त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे.

साहित्य

 • वेस्ट डि कंपोजर 
 • किलो गुळ
 • २०० लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम किंवा मातीचा रांजण (कोणत्याही धातूचा अजिबात नको)
 • २०० लिटर पाणी (विहिरीचे, बोअरचे अथवा नळाचे यापैकी कुठलेही चालेल)

कसे बनवावे

ड्रममधे २०० लिटर पाणी टाकावे. त्यात वेस्ट डि कंपोजर बाटलीतील कल्चर किलो गुळ टाकून लाकडी काठीने ते मिनिट ढवळावे. यानंतर हे द्रावण स्वच्छ कापड अथवा बारदानाने झाकावे. स्थानिय वातावरण तापमानानुसार हे द्रावण तयार होण्यास  ते दिवसाचा अवधी जरूरी आहे. यादरम्यान दररोज दोनदा हे द्रावण लाकडी काठीने ते मिनिट ढवळावे. द्रावण बनवताना ड्रम सावलीत किंवा उघड्यावर ठेवावे अशी कोणतीही अट नाही

पहिल्या दिवशी द्रावणाचा रंग त्यातील गुळामुळे काहीसा तांबूस दिसेल. तीन दिवसानंतर हा रंग काहीसा दुधाळ दिसू लागेल. व्या किंवा व्या दिवशी द्रावणाचा रंग पूर्णपणे दुधाळ दिसू लागेल. याचा अर्थ कल्चरमधील जीवाणू एंझाइम्स द्रावणात पूर्णपणे विकसीत झाले आहेत द्रावण वापरण्यासाठी तयार आहे

कसे वापरावे

जमीनीमधे

तयार झालेले २०० लिटर द्रावण एकरास ठिबकद्वारे अथवा पाटपाण्याने द्यावे. यामुळे जमीनीत सूक्ष्मजीवाणू गांडूळांची वाढ होऊन जमिन सुपिक भुसभुशित बनते. जमीनीतील सेंद्रीय पदार्थांचे अतीशीघ्र विघटन होऊन त्यांचे अन्नद्रव्यात रूपांतर होते. ही अन्नद्रव्ये पिकाच्या मुळांना सहजी ग्रहण करता येतात. परीणामी पिकांची वाढ जोमाने होते.

फवारणीसाठी

पिकांवर फवारणीसाठी लिटर पाण्यात ३०० मिली. या प्रमाणात वेस्ट डि कंपोजर द्रावण मिसळून दर ते १५ दिवसांनी फवारल्यास हानीकरक बुरशी कीड यांचा उपद्रव होत नाही. या प्रमाणानुसार फवारणीच्या १५ लिटर क्षमतेच्या पंपात ते . लिटर द्रावण मिसळावे. आपल्या परीसरात होणाऱ्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार फवारणीचा काळ आपण ठरवावा.

 शेणखत कुजवण्यासाठी कंपोस्ट बनविण्यासाठी

अंदाजे टन शेणखताच्या ढिगावर केवळ २० लिटर वेस्ट डि कंपोजर द्रावण शिंपडावे. एक आठवड्यानंतर हा ढिग पलटावा त्यावर पुन: २० लिटर द्रावण शिंपडावे असे दर आठवड्याला करत ४० दिवसात उत्तम प्रतीचे कुजलेले शेणखत तयार होते ज्यामधे उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या अधिक आहे. शेणाऐवजी आपल्याकडील जमा केलेला काडीकचरा किंवा धान्य मळणीनंतर निघालेला कोणत्याही पिकाचा भुसा यावरही अशीच प्रक्रिया करून उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार करता येते.

महत्वाचे

एकदा तयार झालेया या द्रावणापासून आपण पुन: पुन: नवीन द्रावण तयार करू शकता. यासाठी तयार द्रावणातून पहील्यांदा २० लिटर द्रावण शिल्लक ठेवून त्यात किलो गुळ १८० लिटर पाणी टाकून वरील प्रमाणेच कृती करावी. ते दिवसात तेवढ्याच उपयुक्ततेचे द्रावण तयार होईल. किंवा तयार झालेल्या द्रावणातून नवीन २०० लिटर क्षमतेच्या ड्रम मधे प्रत्येकी २० लिटर द्रावण, किलो गुळ १८० लिटर पाणी टाकून पुढील ते दिवसात आपणास १००० लिटर द्रावण तयार होऊ शकते.

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping