पेरू भाग 1 लागवड पूर्व प्रशिक्षण | Peru Section 1 Pre-Plantation

पेरू भाग 2 लागवड करताना प्रशिक्षण | Peru Section 2 During-Plantation

पेरू भाग 3 लागवडीनंतर प्रशिक्षण | Peru Section 3 Post-Plantation

Introduction ( प्रस्तावना )

खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळं भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यासजामकिंवाअमरूदअसेही संबोधले जाते. आवळ्याच्या खालोखाल भरपूरजीवनसत्व देणारे हें फळं असून पावसाळ्याच्या थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या व्हायरसपासून संरक्षण मिळवून देणारे आहे. . पेरूला  ” गरीबांचे सफरचंदअसे म्हणतात, तसेच पेरू हे कोरडवाहू फळझाड म्हणुन ओळखले जाते, पेरू चे फळं हे स्वस्त रुचकर, आरोग्याच्या द्रुष्टीने लाभदायक आहे. पेरूची लागवड जवळजवळ भारतात सर्व राज्यात होते. तसेच महाराष्ट्रात कोरडवाहू भागात पेरू हे फळझाड वरदान ठरले आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करणारे पेरूचे झाड हे फार कणखर चिवट असते .

 

महाराष्ट्रात पेरू या पिकाची मोठया प्रमाणात लागवड होत आहे. भारतामध्ये .६८ लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यात या पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात एकूण ४०,००० हेक्टर. क्षेत्रावर पेरु लागवड केली जाते. लागवडी खालील क्षेत्रात उत्तरप्रदेशानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. सध्या महाराष्ट्रा तील पेरू या पिकाची उत्पादकता अवघी . मे. टन प्रती ` हेक्टर इतकी आहे. या उलट उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात तीं अनुक्रमे १३. आणि १२. में. टन प्रती हेक्टर एवढी आहे. पेरू फळाच्या साल गरामध्ये जीवनसत्व मोठया प्रमाणात उपलब्ध असते. मलावरोध, रक्त विकार रक्तपित्त . विकारात पेरु अतिशय गुणकारी आहे .

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping