Papaya Training – Marathi | पपई प्रशिक्षण – मराठी

$0.00$0.00

Description

ग्लोबल विकास ट्रस्टच्या ग्लोबल  परळी या प्रकल्पात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आह्माला फळ  लागवडीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर जास्तीत जास्त शेतकयांना फळलागवडीकडे वळवण्यासाठी  आह्मी  पपई लागवड संदर्भातील माहिती व्हिडिओ स्वरूपात आपणास उपलबध करून देत आहोत.  हि माहिती आपणास ट्रेनींग स्वरूपात  देताना आह्माला फार  आनंद होत आहे. आपण याचा आपल्या शेती साठी नक्की उपयोग  कराल. 

पपई पिकाची लागवड सर्वप्रथम मेक्सिको येथे करण्यात आली आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प बंगाल , आसाम, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात पपई या पिकाच्या वेगवेगळ्या जातीची लागवड करण्यात येते.मात्र तैवान पपईच्या जातीची साल जाड असल्यामुळे फळ टिकण्याचा  कालावधी जास्त व चवीला गोड , उत्पादन क्षमता अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तैवान ७८६ या जातीची लागवड केली जाते . पपई खाण्यासाठी जशी चविस्ट आहे तसे ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पपईचे आहारात सेवन केल्यामुळे भूक वाढते व पोटाचे, यकृताचे , आतड्याचे तसेच अशाप्रकारच्या व्याधी पासून मानवी शरीराला दूर ठेवते . पपई मध्ये A , B, आणि D  हे जीवनसत्व व कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते. पपई पिकाचे शास्त्रीय नाव कॅरिक पपया आहे. भारत देशात प्रति वर्षी २६ लाख टन उत्पादन होते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Papaya Training – Marathi | पपई प्रशिक्षण – मराठी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping